IPL 2024 (DC vs RR Match 56, Toss update ) : आज आयपीएल 2024 च्या 56 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना 7.30 वाजता सुरू होईल.
दरम्यान, इथून प्रत्येक सामना हा दिल्ली संघासाठी करा किंवा मरा असा आहे. एक पराभवही त्याच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो. त्याचवेळी राजस्थान प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. तो अंतिम चारमध्ये पोहोचणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा राजस्थान रॉयल्स संघाच्या बाजूनं लागला आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरतील.
🚨 Toss Update 🚨
Rajasthan Royals elect to bowl against Delhi Capitals.
Follow the Match ▶️ https://t.co/nQ6EWQGoYN#TATAIPL | #DCvRR pic.twitter.com/9wUBINZAHf
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2024
दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात आतापर्यंत एकूण 11 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये पाच विजय आणि सहा पराभवांमुळे 10 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, राजस्थान दहा सामन्यांतून आठ विजयांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानने यंदाच्या आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे.
दरम्यान, आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी, दिल्ली कॅपिटल्सला आज राजस्थान रॉयल्ससारख्या फॉर्ममध्ये असलेल्या संघाचा पराभव करावा लागेल आणि सर्वांच्या नजरा कर्णधार ऋषभ पंत आणि जॅक फ्रेझर मॅकगुर्क यांच्या बॅटवर असतील. दिल्लीला प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहायचे असेल, तर त्यांना आपल्या घरच्या मैदानावर कोणत्याही किंमतीवर विजय मिळवावा लागेल, तर राजस्थानला हा सामना जिंकून अधिकृतपणे बाद फेरी गाठण्याची संधी असेल.