IPL 2024 (DC vs RR Match 56, Live Score update ) : आयपीएल 2024 च्या 56 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. दरम्यान, इथून प्रत्येक सामना हा दिल्ली संघासाठी करा किंवा मरा असा आहे. एक पराभवही त्याच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो. त्याचवेळी राजस्थान प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. तो अंतिम चारमध्ये पोहोचणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. दिल्लीने राजस्थानसमोर विजयासाठी 222 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दिल्ली संघाने 20 षटकात 8 गडी गमावून 221 धावा केल्या आहेत.
JFM™ Party + Porel Power + TriStorm = 💪🔥
Let’s defend this together, Dilli 💙 pic.twitter.com/JoX1tLJHW0
— Delhi Capitals (@DelhiCapitals) May 7, 2024
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अभिषेक पोरेल, जॅक फ्रेझर आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. अभिषेक आणि जॅक यांनी अर्धशतके झळकावली तर ट्रिस्टननेही शेवटी जोरदार फटकेबाजी करत आणि संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
जेक फ्रेझर मॅकगर्कने 20 चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 50 धावा केल्या तर अभिषेक पोरेलने 36 चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 65 धावा केल्या. याशिवाय शाई होप 1 धावा करून, अक्षर पटेल 15 धावा करून आणि कर्णधार ऋषभ पंत 15 धावा करून बाद झाला. आयपीएलचा पहिला सामना खेळणाऱ्या गुलबदिन नायबने 19 धावा केल्या. त्याचवेळी ट्रिस्टन स्टब्सने 20 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 41 धावांची खेळी केली. रसिक दार सलामने तीन चेंडूंत नऊ धावा केल्या तर कुलदीप यादवने दोन चेंडूंत पाच नाबाद धावा केल्या. रसिक सलाम डावाच्या शेवटच्या चेंडूवर धावबाद झाला. त्याने तीन चेंडूत नऊ धावा केल्या.
T20 World Cup 2024 : पाच विदेशी संघांत तब्बल 22 खेळाडू भारतीय वंशाचे, ‘या’ संघात सर्वाधिक 8 खेळाडू….
राजस्थानकडून अश्विनने सर्वाधिक तीन बळी घेतले. त्याने आपल्या 4 षटकात 24 धावा दिल्या. तर ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा आणि चहल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. आवेश खान सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 2 षटकात 42 धावा दिल्या.