Election 2024 – कोल्हापूर लोकसभेसाठी सुरू असणाऱ्या मतदानात एका वृद्ध व्यक्तीचा मतदानाच्या रांगेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
कोल्हापूर शहरातील उत्तरेश्वर पेठेतील रमबाई आंबेडकर शाळेतील मतदान केंद्रावर ही घटना घडली. येथे महादेव श्रीपती सुतार (69) हे मतदानासाठी आले होते. तिथे रांगेत उभे असताना त्यांना भोवळ आली.
त्यानंतर ते जागेवरच कोसळले. यावेळी त्यांच्या नातलगांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
दुसरीकडे, करवीर तालुक्यातील भुये येथे मतदान करून घरी जाणारी एक महिला मुलाच्या दुचाकीवरून पडून जबर जखमी झाली. बालिंगे पाडळी येथे ही घटना घडली. कमल विलास पोवार (60) असे महिलेचे नाव आहे.