IPL 2024 (DC vs RR Match 56, Toss & Playing XI update ) : आज आयपीएल 2024 च्या 56 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना 7.30 वाजता सुरू होईल. दरम्यान, इथून प्रत्येक सामना हा दिल्ली संघासाठी करा किंवा मरा असा आहे. एक पराभवही त्याच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो. त्याचवेळी राजस्थान प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. तो अंतिम चारमध्ये पोहोचणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा राजस्थान रॉयल्स संघाच्या बाजूनं लागला आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरतील.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. यष्टिरक्षक ध्रुव जुरेल आणि शिमरॉन हेटमायर खेळत नाहीत. त्यांच्या जागी शुभम दुबे आणि डोनोवन फरेरा यांनी संघात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतनेही प्लेइंग-11 मध्ये काही बदल केले आहेत. लिझार्ड विल्यमसन आणि पृथ्वी शॉ यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी इशांत शर्मा आणि गुलबदिन नायबला संधी देण्यात आली आहे. अफगाणिस्तानचा गुलबदिन नायब आणि दक्षिण आफ्रिकेचा डोनोवन फरेरा यांचा हा आयपीएल पदार्पण सामना आहे.
🚨 Toss Update 🚨
Rajasthan Royals elect to bowl against Delhi Capitals.
Follow the Match ▶️ https://t.co/nQ6EWQGoYN#TATAIPL | #DCvRR pic.twitter.com/9wUBINZAHf
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2024
DC vs RR : दोन्ही संघाचे Playing 11 खालीलप्रमाणे…
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रियान पराग, शुभम दुबे, रोवमन पॉवेल, डोनोवन फरेरा, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल. ( इम्पॅक्ट सब : जोस बटलर, कुलदीप सेन, टॉम कोहलर-कॅडमोर, तनुष कोटियन, कुणाल सिंग राठौर)
दिल्ली कॅपिटल्स : जेक फ्रेझर मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, गुलबदिन नायब, अक्षर पटेल, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा, मुकेश कुमार. ( इम्पॅक्ट सब : रसिक दार सलाम, प्रवीण दुबे, ललित यादव, सुमित कुमार, कुमार कुशाग्रा )
दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात आतापर्यंत एकूण 11 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये पाच विजय आणि सहा पराभवांमुळे 10 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, राजस्थान दहा सामन्यांतून आठ विजयांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानने यंदाच्या आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे.
दरम्यान, आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी, दिल्ली कॅपिटल्सला आज राजस्थान रॉयल्ससारख्या फॉर्ममध्ये असलेल्या संघाचा पराभव करावा लागेल आणि सर्वांच्या नजरा कर्णधार ऋषभ पंत आणि जॅक फ्रेझर मॅकगुर्क यांच्या बॅटवर असतील. दिल्लीला प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहायचे असेल, तर त्यांना आपल्या घरच्या मैदानावर कोणत्याही किंमतीवर विजय मिळवावा लागेल, तर राजस्थानला हा सामना जिंकून अधिकृतपणे बाद फेरी गाठण्याची संधी असेल.