मुंबई – पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक केली. सध्या राज कुंद्रा न्यायालयीन कोठडीत असून राज कुंद्रा विरोधात अनेक पुरावे हाती लागल्यामुळे राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली. दरम्यान राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीची काही बॅंक खाती देखील या कारवाईत सील करण्यात आली आहेत.
View this post on Instagram
राज कुंद्रा अटकेत असतानाच आता शिल्पा शेट्टीच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. कारण आयोसिस वेलनेस सेंटरच्या नावावर अनेक लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा शेट्टी यांच्यावर करण्यात आला आहे.
View this post on Instagram
शिल्पा शेट्टी आणि तिच्या आई विरोधात लखनऊमधील हसरतगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता लखनऊ पोलिसांची टीम या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी मुंबईत दाखल झाली आहे.
View this post on Instagram
लखनऊमधील ज्योत्सना चौहान आणि रोहित वीर सिंह यांनी शिल्पा शेट्टी आणि तिच्या आई विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिल्पा शेट्टी आणि तिच्या आई विरोधात पोलिसांच्या चौकशीत पुरावे हाती लागल्यास शिल्पा शेट्टीला आईसह अटक होण्याची शक्यता आहे.