हैदराबाद – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या संदर्भात असभ्य टिप्पणी केल्याबद्दल निवडणूक आयोगाने माजी मुख्यमंत्री आणि तेलगु देसम पक्षाचे प्रमुख एन. चंद्रबाबू नायडू यांना ताकीद दिली आहे. भविष्यात सार्वजनिक रित्या काही बोलताना काळजी घेण्याच्या सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत.
जगनमोहन रेड्डी एक खोटारडा माणूस आहे. सामान्य खोटारडा नाही तर महा धोकेबाज माणूस आहे असे नायडू यांनी म्हटले होते. ते पुढे म्हणाले होते की, भगवान रामाने रावणासूराचा वध केला होता. तुम्ही लोक काय करणार? तुम्ही राक्षस जगनचे काय करणार असा सवाल त्यांनी उपस्थित जनसमुदायाला विचारला होता.
Lok Sabha Election 2024 : ‘भाजपकडून मतदान बूथ लुटण्याचा प्रयत्न’; अखिलेश यांचा आरोप
दरम्यान, आंध्र प्रदेशचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी एम. एन. हरेंधिरा प्रसाद म्हणाले की, निवडणूक आयोगाने आंध्र प्रदेशचे पोलीस महासंचालक के. व्ही. राजेंद्रनाथ रेड्डी यांना हटवले असून हरिश कुमार गुप्ता यांना नवे महासंचालक नियुक्त करण्यात आले आहे. १९९२ च्या बॅचचे अधिकारी असलेले आयपीएस गुप्ता यांना तातडीने पदभार स्विकारण्यास सांगण्यात आले आहे.