पुणे-वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट परीक्षेला ऑनलाइन अर्ज करण्याची मंगळवारी (दि.10) शेवटची संधी आहे, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) दिली आहे. त्यानुसार इच्छुक विद्यार्थ्यांना तात्काळ अर्जासोबत उमेदवारांना शुल्क भरावे लागणार आहे.
नीटचे आयोजन एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएएस, बीयूएमएस, बीएचएमएस अशा विविध वैद्याकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केला जातो. या अभ्यासक्रमांसोबत बीएससी (ऑनर्स) नर्सिंग कोर्सचा देखील यावर्षी प्रवेशासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना नीट यूजीसाठी अर्ज करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना नीटसाठीचा (यूजी) अर्ज एनटीएच्या पींरपशशीं.पळल.ळप वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे.