मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम लल्लाच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्याचे देण्यात आले आहे परंतु त्यांनी हे निमंत्रण नाकारले नाकारले आहे. त्यांनी म्हटले आहे की अयोध्येतील मंदिराचे बांधकाम पुर्ण झाल्यावर आपण तेथे दर्शनासाठी जाऊ.
पवार यांनी बुधवारी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांना लिहिलेल्या पत्रात निमंत्रण पाठवल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे,असे पवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
मर्यादा पुरुषोत्तम श्री राम हे भारतातील आणि जगातील कोट्यवधी भाविकांच्या उपासनेचे आणि भक्तीचे प्रतीक आहे. देशभरातील भाविकांमध्ये उत्साह आहे. त्यांच्याद्वारे ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद माझ्यापर्यंत पोहोचेल.मात्र आपण स्वता २२ जानेवारीनंतर अयोध्येच्या नियोजित दौऱ्यात मंदिराचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर मंदिराला भेट देऊ असेही त्यांनी स्पष्ट केले.
२२ जानेवारीला समारंभ आटोपल्यानंतर श्री राम लल्लाचे दर्शन शांततेने आणि भक्तिभावाने करता येईल. माझी अयोध्येला जाण्याची नियोजित भेट आहे, आणि त्यावेळी मी श्री राम लल्लाचे दर्शन घेईन, तोपर्यंत मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल. मंदिरही पूर्ण होईल, असे पवार म्हणाले.
मी पुन्हा एकदा निमंत्रणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि समारंभाच्या यशस्वीतेसाठी माझ्या शुभेच्छा देतो, असे त्यांनी म्हटले आहे. इंडिया आघाडीतील बहुसंख्य पक्षांच्या प्रमुखांनी अयोध्येतील निमंत्रण नाकरले आहे.