Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणूक 2024 च्या मतदानाच्या सहाव्या टप्प्यासाठीचा प्रचार काल २३ मेला थांबला आहे. या टप्प्यात 25 मे रोजी आठ राज्यांतील 58 जागांवर मतदान होणार आहे. दरम्यान यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्रात पाच टप्यात निवडणुका झाल्या, येत्या ४ जूनला सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल घोषित केले जातील. त्यापूर्वी सर्वच राजकीय पक्ष कुठे किती जागा जिंकणार यावर अंदाज लावतांना दिसत आहे सत्तेत असलेले भाजपने ४०० पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा दावा केला आहे. इंडियाच्या आघाडीने यंदा गुलाल आपलाच असल्याच्या विश्वास व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणूक 2024 नंतर देशातील सत्ता नेमका कोणाला मिळणार यावर सगळीकडेच जोरदार सत्ता सुरू आहे. अशात शरद पवार यांनी नुकतीच एका माध्यमांला दिलेल्या मुलाखतीत येत्या निवडणूक निकालावर भाष्य केल आहे. मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारण्यात आला भाजपला 272 जागा मिळया तर त्यांच्या सोबत युती करणार का यावर ते म्हणाले,”काही कारणच नाही.. कारण त्यांची धोरणंच आम्हाला पसंत नाहीत. मी मघाशीच तुम्हाला सांगितलंय व्यक्तिगत संबंध राहतील. व्यक्तिगत सलोखा, संबंध आणि राजकीय निर्णय यामध्ये जमीन आस्मानचा फरक आहे. उद्या संसदेत.. मी अजून राज्यसभेत आहे.. भेट झाली त्यांची तर आम्ही बोलणार नाही असं नाही.. पण याचा अर्थ उद्या संसदेत मी त्यांच्या बाजूने हात नाही वर करणार’ असेही पवार म्हणाले. हे वाचलं का ? ‘लांब पांढरी दाढी अन् कुर्ता-पायजमा’ २२ हत्या करणारा किस्सू तिवारी साधूच्या वेशात रामलल्लाच्या दर्शनाला गेला; पोलिसांनी केली अटक