Uddhav Thackeray on Gadkari। भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली १९५ उमेदवारांची यादी जाहीर केलीय. य यादीतून बड्या नेत्यांचा पत्ता कट करण्यात आलाय. त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचाही समावेश आहे. त्यांचे यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याच चर्चांवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच नितीन गडकरींना खुली ऑफर दिलीय. उद्धव ठाकरेंची धाराशिवमध्ये सभा झाली त्यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींना उद्देशून बोलताना, “दिल्लीपुढे झुकू नका, दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा. महाविकास आघाडीत या, तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची” असे म्हणत खुली ऑफर दिलीय.
“अहो नितीन जी सोडून द्या भाजप Uddhav Thackeray on Gadkari।
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, “अहो नितीन जी सोडून द्या भाजप आणि राहा उभं, आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडून निवडून आणतो. महाराष्ट्राचं पाणी दाखवा, महाराष्ट्राची धमक दाखवा. महाराष्ट्र दिल्ल समोर कधीही झुकला नाही. आग्र्यात औरंगजेबासमोर छत्रपती शिवाजी महाराज झुकले नव्हते, ती यांच्यासमोर झुकणार. आज मी नितीन गडकरी यांना जाहीर सांगत आहे, राजीनामा द्या, आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडून निवडून आणतो,” असे ठाकरे म्हणाले.
तुळजाभवानी आईची शपथ घेऊन सांगतो … Uddhav Thackeray on Gadkari।
पुढे बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘जय श्रीराम घोषणा आहे, आम्ही देखील श्रीरामाचे भक्त आहोत. त्यावेळी जे काही उसळले होते, तेव्हा भारतीय जनता पक्षाचं कुणीही रस्त्यावर फिरकायला देखील तयार नव्हतं. तेव्हा त्यांच्या छातीत धडकी भरली होती. ज्यावेळी नरेंद्र मोदी यांचे नाव कोणाला माहित नव्हतं, त्यावेळी पासून आम्ही हिंदुत्वाचा झेंडा घेऊन राज्यामध्ये भाजपच्या कित्येक पट पुढे गेलो होतो.
तुळजाभवानी आईची शपथ घेऊन सांगतो, 2019 मध्ये अमित शाहांनी मला अडीच-अडीच वर्षांचं मुख्यमंत्री पद आपण दोघेही वाटून घेऊ असा शब्द दिला होता. अमित शहा खोटं बोलत असल्याचं मी तुळजाभवानी आईची शपथ घेऊन सांगत आहे. त्यावेळी त्यांनी तो शब्द मोडला असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.