amir khan । दीड वर्ष चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतर आमिर खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘सीतारे जमीन पर’ मुळे चर्चेत आहे.अशात आमिरने या चित्रपटाच्या सेटवरून सोशल मीडियावर लाइव्ह येत युजर्स सोबत संवाद साधला. यावेळी आमिरने चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तर ट्रोलिंग करणाऱ्या चाहत्यांनाही आमिरने त्यांचे स्टाईलने समजावले.या लाईव्ह दरम्यान आमिरने ने इलेक्ट्रिक सिगारेट जाळत धुम्रपान करायला सुरुवात केली त्यामुळे तो आता चांगलाच चर्चेत आला आहे.
इन्स्टाग्राम लाईव्हमध्येही त्याने चाहत्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. मात्र मध्येच त्याने इलेक्ट्रिक सिगारेट जाळत धुम्रपान करायला सुरुवात केली. यावर एका चाहत्याने कमेंट केली, ड्रग्स घेतोय का? यावर आमिरला कमेंट वाचून धक्काच बसला आणि त्याने त्याच्या स्टाईलमध्ये विचारले, ‘काय बोलतोय यार?’ असं म्हणत स्माईल दिली.
यानंतर एका विचारले की, अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये आमिरने का डान्स केला? यावर आमिरने उत्तर दिले की, तो आणि मुकेश-नीता अंबानी खूप जवळचे मित्र आहेत. आमिर म्हणाला की, मी फक्त त्याच्या लग्नातच नाचलो नाही तर आमच्या अनेक फॅमिली फंक्शन्समध्येही डान्स केला.’
‘सीतारे जमीन पर’ व्यतिरिक्त आमिर अनेक चित्रपटांची निर्मिती करत आहे. यामध्ये सनी देओल स्टारर ‘लाहोर 1947’ आणि आमिरचा मुलगा जुनैदचा ‘एक दिन’ या चित्रपटाचाही समावेश आहे. ही एक प्रेमकथा आहे ज्यामध्ये जुनैदसोबत सई पल्लवी दिसणार आहे.