पिंपरी -निगडी पोलिसांनी दोन मोबाइल चोरांना पकडले असून त्यांच्याकडून 31 मोबाइल जप्त केले आहे. दत्ता संतोष धोत्रे (वय 20, रा. ओटास्किम, निगडी), हर्षित शामनारायण सिंह (वय 22, रा. महाळुंगे, ता. खेड. मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक चोरट्यांची नावे आहेत. ट्रान्सपोर्टनगर निगडी येथे मोबाइल फोन विक्रीसाठी आलेल्या दत्ता धोत्रे याला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्याच्याकडे चौकशीदरम्यान चार मोबाइल फोन पोलिसांना मिळाले. त्याने निगडी, महाळुंगे, तळवडे आणि पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात रात्रीच्या वेळी फिरून घरातून मोबाइल चोरले आहेत. ते मोबाईल फोन त्याने त्याचा मित्र हर्षित सिंह याला विकले होते. पोलिसांनी हर्षितला महाळुंगे येथून ताब्यात घेतले. दोघांकडे कसून चौकशी करत तब्बल 31 महागडे मोबाइल फोन जप्त केले. आरोपी 15-20 मोबाइल जमा झाल्यानंतर ते एकत्रित दुस-या साथीदाराला विकायचे आणि दुसरा साथीदार ते मोबाइल फोन उत्तर प्रदेश,
शहरात चोरलेले मोबाइल जायचे परप्रांतात
आरोपी दत्ता मोबाइल फोन चोरुन एकत्रितपणे हर्षितला देत असे. हर्षित मूळचा उत्तर प्रदेशचा असल्याने त्याच्या उत्तर प्रदेश, बिहार मधून शहरात कामानिमित्त आलेल्या तरुणांसोबत ओळखी होत्या. एखादा तरुण गावी जात असेल तर त्याला मिळेल त्या किमतीत हर्षित चोरलेले मोबाइल फोन विकत असे. एखाद्या मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात तांत्रिक तपास करून मोबाइल ट्रेस झाल्यास तो उत्तर प्रदेश, बिहार अशा उत्तर भारतातील राज्यात असल्याचे उघड होते.