IPL 2024 ( Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals, Match 50 Toss update ) : आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्ससमोर सनरायझर्स हैदराबादचे आव्हान असणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जाईल, भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. सध्या राजस्थान रॉयल्स 9 सामन्यांत 16 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर सनरायझर्स हैदराबाद 9 सामन्यांत 10 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
हैदराबादला मागील दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा स्थितीत राजस्थानविरूध्द सामना जिंकून पराभवाची हॅट्ट्रिक रोखण्याकडे सनरायझर्स हैदराबादचे लक्ष असेल. तर राजस्थान रॉयल्सने गेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला होता. राजस्थानने हा सामना 7 विकेटने जिंकला होता. आजचा सामना जिंकून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याकडे राजस्थानचे लक्ष असेल, तर मागील दोन सामन्यांत पराभवाचा सामना करणाऱ्या हैदराबादकडे पुनरागमनाचे लक्ष असेल.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल (Toss Update) हा सनरायझर्स हैदराबाद संघाच्या बाजूनं लागला आहे. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss Update 🚨@SunRisers win the toss and will be batting first against @rajasthanroyals
Follow the Match ▶️ https://t.co/zRmPoMjvsd#TATAIPL | #SRHvRR pic.twitter.com/VUCv2r7X9x
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2024
दरम्यान, हैदराबादच्या खेळपट्टीवर झालेल्या याआधीच्या सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, येथे फलंदाजांचे वर्चस्व आहे. येथील खेळपट्टी पूर्णपणे सपाट आहे. इथे अनेक वेळा 200 पेक्षा जास्त आणि 250 धावा झाल्या आहेत. दोन्ही डाव एकत्र केले तर 500 धावांचा टप्पाही पार केला आहे. येथे गोलंदाजीत फिरकीपटू नक्कीच काही प्रभाव दाखवू शकतात. बाकी वेगवान गोलंदाजांसाठी इथे फार काही नाही.
आयपीएलच्या इतिहासात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 18 सामने खेळले गेले आहेत. यापैकी राजस्थानने 9 आणि हैदराबादने तेवढेच सामने जिंकले आहेत. म्हणजे दोन्ही संघात स्पर्धा तुल्यबळ आहे.