वाघा बॉर्डरवरून अफगाणिस्तानशी व्यापार

पाकिस्तान सरकारचा निर्णय

इस्लामाबाद – अफगाणिस्तान सरकारच्या विशेष विनंतीवरून पाकिस्तान सरकारने भारताच्या वाघा सीमेवरून अफगाणिस्तानला निर्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 15 जुलैपासून ही निर्यात सुरू केली जाईल, असे पाकिस्तानने म्हटले आहे. करोना प्रसाराच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानने मार्च महिन्यापासून अफगाण सीमा सील केली आहे.

तथापि, अफगाणिस्तानच्या विशेष विनंतीवरून त्यांनी वाघा बॉर्डरवरून भारतमार्गे अफगाणिस्तानशी निर्यात व्यवहार सुरू करायचे त्यांनी ठरवले आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात सीमेलगत 18 क्रॉसिंग पॉइंटस्‌ आहेत. तथापि, करोना प्रसार रोखण्यासाठी पाकिस्तातनने अफगाणिस्तान व इराणी सीमेवरील असलेली सर्व एन्ट्री पॉइंटस्‌ बंद केले आहेत. त्यामुळे पाकिस्तानातून अफगाणिस्तानला होणारी निर्यात थांबली होती, पण आता ती भारत मार्गे सुरू केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.