शिरूर-(वार्ताहर) : येरवडा कारागृहातून फरार झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात शिरूर पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शोध पथकाला यश आले आहे.
अनिल विठ्ठल वेताळ रा.डिंग्रजवाडी,कोरेगाव भीमा ता.शिरूर असे याप्रकरणी अटक केलेल्या फरार आरोपीचे नाव आहे याबाबतची माहिती अशी की दिनांक 23 जून रोजी शिक्रापूर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा खाली या आरोपीला मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाल्याने येरवडा येथील कारागृहात सोडले होते. त्यानंतर हा आरोपी काल शनिवार दिनांक 12 रोजी येरवडा कारागृह फरार झाल्याची माहिती पोलिस ठाण्याला कळाली त्यानुसार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील ,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते ,दौंड उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली
शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक काबुगडे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे पोलीस नाईक संजु जाधव व पोलीस कॉन्स्टेबल संजय साळवे यांच्या यांच्या पथकाला गुप्त बातमी दारा मार्फत समजलेल्या माहितीनुसार हा आरोपी रामलिंग रोड परिसरात सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिरताना आढळला त्यावेळी या पथकाने त्याला शिताफीने पकडून जेरबंद केले.