Israel Airstrike in Lebanon। इस्त्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमध्ये हल्ला केलाय. संरक्षण मंत्री योग गॅलेंट यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी इस्त्रायली सैनिकांनी सीमा ओलांडली की नाही हे सांगितले नाही. “बहुसंख्य सैन्य सीमेवर तैनात केले गेले आहेत. आयडीएफ दल सध्या दक्षिण लेबनॉनमध्ये आक्षेपार्ह कारवाया करत आहेत,” गॅलंट यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
एएफपीनुसार, इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी दावा केला आहे की, लेबनॉनमधील हिजबुल्लाहचे अर्ध्याहून अधिक कमांडर लष्कराच्या हल्ल्यात मारले गेलेत. कमांडर्सची संख्या न सांगता संरक्षण मंत्री गॅलंट म्हणाले की आयडीएफच्या ऑपरेशननंतर अर्ध्याहून अधिक लपले अन् येथून पळून गेले आहेत. लेबनॉनमध्ये उपस्थित असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम दलाने सांगितले की, आम्ही कोणालाही सीमा ओलांडताना पाहिले नाही. याचा अर्थ इस्रायलने कुठेतरी हवाई हल्ला केला आहे.
हिजबुल्लाहचा साठा आणि शस्त्रास्त्र लक्ष्य Israel Airstrike in Lebanon।
इस्त्रायली लष्कराने दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या 40 स्थानांवर हल्ला केल्याचे म्हटले आहे. त्यात म्हटले आहे, “काही वेळापूर्वी, आयडीएफच्या लढाऊ विमानांनी आणि तोफखान्याने हिजबुल्लाच्या अंदाजे 40 लक्ष्यांवर हल्ला केला. हा हल्ला ऐता अल-शाबच्या आसपास करण्यात आला, ज्यामध्ये हिजबुल्लाहच्या स्टोरेज आणि शस्त्रास्त्रांच्या सुविधांनाही लक्ष्य करण्यात आले.” इस्रायलवर हल्ले करण्यासाठी हिजबुल्लाने येथे पायाभूत सुविधा तयार केल्या असल्याचे लष्कराने म्हटले आहे.
हिजबुल्लाहचाही इस्रायलवर हल्ला Israel Airstrike in Lebanon।
लेबनॉनवर हा हल्ला अशा वेळी झाला जेव्हा इराण समर्थित हिजबुल्लाहने बुधवारी इस्रायलवर रॉकेट डागल्याचे सांगितले. या हल्ल्यापूर्वी लेबनॉनमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यासाठी हिजबुल्लाहने इस्रायलला जबाबदार धरले होते. मंगळवारीही हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलमध्ये रॉकेट डागले. हे लोक आता नागरिकांना लक्ष्य करत आहेत, असे हिजबुल्लाचे सदस्य हसन फदल्लाह यांनी म्हटले होते. शत्रूला सांगायचे आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहोत.
हेही वाचा
इराणनंतर इराकमध्ये हवाई हल्ला ; लष्करी तळावर मोठा स्फोट, इस्रायलवर हल्ल्याचा संशय