नगर -सध्या करोनामुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. रोटरी क्लबच्यावतीने त्याबाबत पुढाकार घेत आहे, ही चांगली बाब आहे.अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण होऊन, तेही समाजात जनजागृती करतील. त्यामुळे लवकरच करोनापासून मुक्ती मिळेल, असा विश्वास शासकीय तंत्रनिकेतन संस्थेचे प्राचार्य प्रा.मुकुंद सातारकर यांनी व्यक्त केला.
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर च्यावतीने शासकीय तंत्रनिकेतन संस्थेला सॅनिटयझर स्टॅण्ड व सॅनिटर देण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष ऍड. अमित बोरकर, सचिव पुरुषोत्तम जाधव, भावना वैकर, प्रिती बोरकर, नेहा जाधव, सोनल ताथेड आदिंसह रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी रोटरीचे अध्यक्ष ऍड. बोरकर म्हणाले, रोटरी क्लबने नेहमीच सामाजिक दायित्व जपले आहे. गरजूंना मदत, विद्यार्थ्यांना मदत, महिला सबलीकरण, आरोग्य याच बरोबर पर्यावरण रक्षणासाठीही कार्य करत आहोत.