डोर्लेवाडी (प्रतिनिधी) : काल एकूण 53 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 46 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आलेला असून तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे व चार जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या तीन जणांमध्ये भीम नगर बारामती येथील तीस वर्षाची महिला तसेच, पतंग शहानगर येथील 25 वर्षाचा युवक व निरावागज येथील पन्नास वर्षाच्या पुरुषांचा समावेश आहे. आता बारामतीमधील एकूण रुग्णांची संख्या 127 झालेली आहे.
त्यामधील 62 रुग्ण बरे झालेले आहेत व 54 रुग्ण उपचार घेत आहेत. यात अकरा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले आहे.