पी.चिदंबरम यांच्यासह पुत्राला 50 लाख डॉलरची लाच दिली

इंद्राणी मुखर्जीचा आणखी एक दावा

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांच्या अडचण काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. सीबीआयने आरोपपत्रात त्यांच्या नावाचा समावेश केल्यानंतर आता त्यांच्यावर पुन्हा एकदा आरोप करण्यात आले आहेत. चिदंबरम यांच्यासह त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना 50 लाख डॉलरची लाच दिल्याचा दावा इंद्राणी मुखर्जी यांनी केला आहे. तिच्या या दाव्यानंतर या प्रकरणात त्यांचे पाय आणखी खोलात रुतले असल्याचे दिसत आहे.

परदेशात सिंगापूर, मॉरिशअस, बर्म्युडा, इंग्लंड आणि स्वित्झर्लंडचा समावेश आहे. सीबीआयने आयएनएक्‍स मीडिया प्रकरणांत शुक्रवारी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यात या आरोपांचा समावेश आहे. यासंबंधी विदेशातून न्यायिक सहयोगासाठी पत्र लिहिले आहे, त्याच्या उत्तराची प्रतिक्षा केली जात असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. तपास यंत्रणेने चार कंपन्या आणि आठ लोकांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये 120 बी,420 , 468, 471 आदि कलमे लावण्यात आले आहे.

इंद्राणी मुखर्जी या प्रकरणात सरकारी साक्षीदार झाल्या आहेत. त्या सध्या आपली मुलगी शीना बोराच्या हत्येप्रकरणी मुंबईत कारागृहात कैद आहेत. इंद्राणी यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, लाचेच्या रकमेप्रकरणी आपण मार्च-एप्रिल 2007 मध्ये पी. चिदंबरम यांची भेट घेतली होती. सीबीआयने आयएनएक्‍स मीडिया प्रा. लि.ला मिळालेल्या 403.07 कोटी रुपये विदेशी गुंतवणुकीसाठी मे 2007 मध्ये गुन्हा दाखल केला होता.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.