Karti Chidambaram – काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर या महिन्यात तिसऱ्यांदा हजर झाले. २०११ मध्ये काही चिनी नागरिकांना कथित व्हिसा जारी करण्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची चौकशी केली जात आहे.
तामिळनाडूमधील शिवगंगा लोकसभा मतदारसंघातील खासदार असलेले ५२ वर्षींय कार्ती चिदंबरम यांची या आधी २३ डिसेंबर आणि २ जानेवारी रोजी चौकशी करण्यात आली होती. आज त्यांची दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयात चौकशी करण्यात आली.
निवडणूका जवळ आल्याने हा सारा प्रकार आम्हाला अपेक्षितच आहे अशी प्रतिक्रीया त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की हा सारा निरर्थक प्रकार आहे, पण केवळ जुलमामुळे आम्हाला त्याला सामोरे जावेच लागणार आहे. एका प्रकल्पात काम करणाऱ्या २६३ चिनी कामगारांना व्हीसा जारी करण्यासाठी कार्ती चिदंबरम यांनी ५० लाख रूपये घेतल्याचा ईडीचा आरोप आहे.