सिंहगड इन्स्टिट्यूटबाबतच्या अफवांना बळी पडू नये

राजेंद्र देशमुख; बदनामी करणाऱ्या आठ जणांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल

सातारा – वडगाव (पुणे) येथील सिंहगड टेक्‍निकल एज्यूकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूटची फेसबुक, व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून अफवा पसरवून बदनामी करणाऱ्या आठ जणांविरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती सिंहगड कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. सिंहगड इन्स्टिट्यूट बाबतच्या अफवेला कोणीही बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

राजेंद्र देशमुख म्हणाले, “”25 वर्ष पूर्ण केलेल्या सिंहगड संस्थेची घोडदौड काही प्रतिस्पर्धी संस्थांना पाहवत नसल्याने त्यांच्याकडून जाणीवपूर्वक सूडबुद्धीने शक्‍य असलेल्या मार्गाने संस्थेविषयी खोटी अफवा पसरवल्या जात आहेत. अफवेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थी व पालकांची दिशाभूल होत आहे. महाराष्ट्रात डायरेक्‍टरपासून शिपायापर्यंत शासकीय नियमाप्रमाणे सहावा वेतन आयोगानुसार वेतन देणारी ही एकमेव संस्था आहे. त्याचबरोबर महिला भगिनींसाठी सहा महिन्यांची प्रसूती रजा, टीए, डीए, पीएफ सारख्या सुविधा दिल्या जातात.

सिंहगड संस्थेत ऍडमिशन घेणारा विद्यार्थी हा प्रामुख्याने मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने पालक व विद्यार्थी हे करिअर ओरिएंटेड असतात. संस्थेने 2650 विद्यार्थ्यांना दर्जेदार कंपनीमध्ये प्लेसमेंट दिले आहे.” याचाच पोटशूळ म्हणून काही प्रतिस्पर्धी संस्था, कॉलेज सिंहगड इन्स्टिट्यूटची बदनामी करत आहेत. यावेळी प्रवीण लोखंडे, ज्ञानेश्‍वर दळवी, किरण बनसोडे, कृष्णा जाधव उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)