नगर -जिल्ह्यात आज तब्बल 1 हजार 31 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 42 हजार 464 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 90.62 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजेपासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत 753 नवे बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 3 हजार 657 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 238, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 194 आणि अँटिजेन चाचणीत 321 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 57, अकोले 35, जामखेड 6, कर्जत 2, कोपरगाव 3, नगर ग्रामीण 10, नेवासे 3, पारनेर 15, पाथर्डी 23, राहाता 10, राहुरी 1, संगमनेर 5, श्रीगोंदा 66, कॅन्टोन्मेंट 1, मिलिटरी हॉस्पिटल 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 194 रुग्णांची नोंद एकूण रुग्णसंख्येत घेण्यात आली. यामध्ये मनपा 75, जामखेड 8, कर्जत 4, कोपरगाव 2, नगर ग्रामीण 19, नेवासे 11, पारनेर 7, पाथर्डी 5, राहाता 25, राहुरी 12, संगमनेर 6, शेवगाव 6, श्रीगोंदा 1, श्रीरामपूर 11 आणि कॅन्टोन्मेंट 2, अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 321 जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा 26, अकोले 21, जामखेड 47, कर्जत 9, कोपरगाव 12, नगर ग्रामीण 8, नेवासे 18, पारनेर 15, पाथर्डी 19, राहाता 23, राहुरी 32, संगमनेर 31, शेवगाव 19, श्रीगोंदा 11, श्रीरामपूर 25, कॅन्टोन्मेंट 5, अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज 1031 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. मनपा 171, अकोले 67, जामखेड 39, कर्जत 44, कोपरगाव 43, नगर ग्रामीण 67, नेवासे 71, पारनेर 57, पाथर्डी 33, राहाता 84, राहुरी 60, संगमनेर 94, शेवगाव 43, श्रीगोंदा 33, श्रीरामपूर 113, कॅन्टोन्मेंटं 9, मिलिटरी हॉस्पिटल 3, अशा रुग्णांचा समावेश आहे.