कोल्हापूर – मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री समोर आंदोलनाचा आज इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आंदोलकांना मध्यरात्रीच स्थानबद्ध केले. तरीही आज ठरल्या वेळेत आंदोलन होणार असल्याचे मराठा आंदोलकांनी जाहीर केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण अंमलबजावणीला स्थगिती दिल्याने मराठा समाजात प्रचंड अस्वस्थता आहे. राज्य सरकारने याबाबत तातडीने पावले उचलावी, या मागणीसाठी मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. अशातच मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरचे आंदोलक आक्रमक झाले आहेत.
यानुसार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलनाची धडक देण्यात येणार होती. कोल्हापूरचे मराठा आंदोलकांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. नवी मुंबई येथे जेवण करत असतानाच आंदोलकांना मध्यरात्री स्थानबद्ध करण्यात आले.
कोल्हापूरचे सकल मराठा समाजाचे नेते दिलीप पाटील, सचिन तोडकर, प्रवीण पाटील, आबा पाटील यांच्यासह 5 जणांना स्थानबद्ध करण्यात आले.