पुढचा मुख्यमंत्री मीच : देवेंद्र फडणवीस

शिवसेनेच्या मंत्र्यांचा सरकारच्या निर्णयाला कायमच पाठींबा

मुंबई : शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हवे असले तरी पुढचा मुख्यमंत्री मिच असेन. उपमुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचे हे शिवसेनेठरवावे, असे सांगत शिवसेनेचा मुख्यमत्रीपदाचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी खोडून खाढला. त्याचवेळी, शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्याने मंत्रीमंडळाच्या कोणत्याही बैठकीत निर्णयाला विरोध केला नाही. ते बाहेर काय बोलतात याला फारसे महत्व नसते, असे सांगत शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

गेले काही दिवस सेना भाजपाच्या युतीत जागावाटपाबाबत धुसफूस सुरू आहे. त्याबाबत इंडिया इनक्‍लेव्हमध्ये बोलताना त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले, आदीत्य ठाकरे यांच्या राजकारण प्रवेशाकडे मी सकारात्मक पध्दतीने बोलतो. त्यांचे स्वागत करतो. मात्र शिवसेना आणि भाजपात मतभेद नव्हते. त्यांच्या कोणत्याही मंत्र्याने सरकारच्या निर्णयाला विरोध केला नाही. ते बाहेर जाऊन काय बोलतात याला फार महत्व नसते, असे त्यांनी सांगितले.

नाणार प्रकल्पाला शिवसेनेच्या मंत्र्यांनी कडाडून विरोध केला होता असा दावा शिवसेनेने केला होता. हा प्रकल्प रद्द करण्याची घोषणाही शिवसेनेच्या दबावतंत्रामुळे झाली होती, मात्र, अलीकडेच महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्पाच्या निर्णयाचा फेरविचार करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या विधानाने शिवसेनेची कोंडी झाली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी जागावटप लोकसभा निवडणुकीपुर्वी निश्‍चित झाल्याचे सांगितले होते. तर काही माध्यमात 126 -162 असे जागावाटप झाल्याचे वृत्त येत होते. त्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, जागावाटपाबाबत अद्याप चर्चा चालू असून येत्या दोन दिवसांत त्याबाबत घोषणा करण्यात येईल. सध्या कोणतेही जागावाटप झाले नाही. झाल्यावर पत्रकार परिषद घेऊन त्याची माहिती देण्यात येईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)