Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या 7 मे रोजी पार पडणार आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 11 जागांवर मतदान पार पडणार आहे.अशात महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतांना दिसत आहे.
अशातच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहे. ‘अदूबाळ नाईट लाईफ प्रायव्हेट लिमिटेड च्या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलेलं एक पात्र हा एक पॉर्न स्टार आहे. आणि तोच या जाहिरातीमध्ये विचारतो की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार ? आणि हाच इसम लहान वयाच्या मुलींसोबत अश्लील चित्रीकरण करतोय. या जाहिरातीत वडिलांच्या भूमिकेत जो व्यक्ती आहे , त्याचे ‘उल्लू’ ॲपवरील एका वेबसीरिजमध्ये नको ते कृत्य करतानाचे व्हिडीओ, क्लिप्स आहेत. अशा माणसाला घेऊन त्यांनी ( ठाकरे गटाने) महिला अत्याचारावरची जाहिरात कशी केली ‘ असा सवाल वाघ यांनी विचारला. यावर आता उद्धव ठाकरे गटातील फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत प्रतिउत्तर दिल आहे.
आक्रस्ताळ्याबाई सवयीप्रमाणे बडबडून गेल्या. पण 3000 हून जास्त सेक्स व्हिडिओ व्हायरल झालेल्या प्रज्वल रेवना, किंवा मुलुंडचे HDव्हिडिओ वाल्याबद्दल त्या अळीमिळी चुपचीळी करून बसल्या.
त्यांची काही चूक नाही, सध्या त्या दिल्या भाकरीच्या & सांगितल्या चाकरीच्या आहेत.@ShivSenaUBT_— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) May 2, 2024
प्रज्वल रेवण्णा यांच्या आजोबांचा पक्ष असलेला जनता दल सेक्युलर हा लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीत आहे. त्यामुळे, भाजपसाठी हा मुद्दा अडचणीचा ठरत असून थेट मोदी-शाह यांना उद्देशून इंडिया आघाडीकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच, सुषमा अंधारे यांनी ट्विट करुन चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला.
हे वाचले का ? चित्रा वाघ यांचा घणाघात,’राज्यात पब, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का?’