पुणे – करोनाचा प्रभाव वाढत असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एप्रिल व मे महिन्यात होऊ घातलेल्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. पुढील तारीख लवकरच कळवली जाणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अर्थात “एमपीएससी’ने 22 मार्च रोजी परिपत्रक काढून “राज्य सेवा पूर्व परीक्षा’ 26 एप्रिल रोजी तर “महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब, संयुक्त पूर्व परीक्षा’ ही 10 मे रोजी होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, राज्यात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढविला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे “एमपीएससी’ने या परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक “एमपीएससी’च्या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल, असे कळविण्यात आले आहे.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा