Rajasthan Lok Sabha Election 2024| लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यासाठी आज 13 राज्यांमधील 88 जागांवर मतदान पार पडत आहे. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 8 मतदारसंघ मतदान प्रक्रियेला सामोरे जात आहेत. तर राजस्थानमध्येही लोकसभा निवडणूकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज शुक्रवारी 26 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता सुरू झाले आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या वसुंधरा राजे आणि त्यांचे नातू विनायक प्रताप सिंह यांनी बारण-झालावाड लोकसभा मतदारसंघातून मतदान केले.
माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या वसुंधरा राजे यांनी बारण-झालावाड लोकसभा मतदारसंघातून मतदान केल्यानंतर त्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोबतच त्यांनी लिहिले की, “मी माझे कर्तव्य बजावले आहे. आता तुमची वेळ आहे.” दरम्यान, सलग पाचवेळा खासदार दुष्यंत सिंह यांच्यावर विश्वास व्यक्त करत भाजपने येथून तिकीट दिले आहे, तर काँग्रेसने बारण जिल्ह्याचे माजी मंत्री प्रमोद जैन भय्या यांच्या पत्नी उर्मिला जैन यांना उमेदवारी दिली आहे.
या जागांवर आज मतदान होत आहे Rajasthan Lok Sabha Election 2024|
दुसऱ्या टप्प्यात आज जोधपूर, बारमेर, पाली, जालोर, राजसमंद, अजमेर, भीलवाडा, चित्तोडगड, उदयपूर, बांसवाडा, टोंक-सवाई माधोपूर, कोटा, बारण-झालावाड या जागांवर मतदान होत आहे. या जागांसाठी एकूण 152 उमेदवार रिंगणात आहेत. झालावाड-बारण लोकसभा मतदारसंघात एकूण 20 लाख 30 हजार 525 मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये 10 लाख 42 हजार 90 पुरुष मतदार, 9 लाख 88 हजार 409 महाला मतदार आणि 16 तृतीय लिंग मतदारांचा समावेश आहे. येथे 2187 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यापैकी झालावाडमध्ये 1151 तर बारणेमध्ये 1036 मतदान केंद्रे आहेत.
वसुंधरा राजे पाच वेळा खासदार Rajasthan Lok Sabha Election 2024|
राजस्थानमध्ये भाजपच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधरा राजे 1989 साली झालावाडमधून खासदार झाल्या आणि सलग पाच वेळा या पदावर निवडून आल्या आहेत. त्यानंतर 2004 मध्ये त्यांचा मुलगा दुष्यंत सिंह येथून खासदार झाला आणि सलग चार वेळा खासदार राहिले. Rajasthan Lok Sabha Election 2024|