Lok Sabha Election 2024| देशभरात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी या आठ मतदारसंघात मतदान होत आहे. या ठिकाणी आता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. या आठ मतदार संघातील उमेदवारांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे. यातच बुलढाणा मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.
बुलढाणा मतदारसंघात 1962 मतदार केंद्रांवर 17.82 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारसंघात ठाकरे गटाचे प्रा. नरेंद्र खेडेकर, शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आणि अपक्ष रविकांत तुपकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे. मागील काही दिवसांपासून या उमेदवारांचा जोरदार प्रचार आणि सभा झाल्या. त्यानंतर आता आज येथे मतदान पार पडत आहे.
रविकांत तुपकरही लोकसभा निवडणूक मैदानात Lok Sabha Election 2024|
रविकांत तुपकर हे सातत्यानं शेतकरी प्रश्नांवर लढत आहेत. सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी आंदोलनं केली आहेत. यानंतर आता ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे महायुती विरोधातील मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. महायुतीकडून शिवसेनेचे (शिंदे गट) विद्यमान खासदार प्रतापराव जाधव, शिवसेना ठाकरे गटातर्फे नरेंद्र खेडेकर तर अपक्ष उमेदवार, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची लढत होणार आहे.
बुलढाणा मतदार संघात येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत होत आहे. या लढतीत रविकांत तुपकर यांची देखील एंट्री झाल्याने येथे नेमका कोणाचा विजय होणार ह पाहणे महत्त्वाचे ठरणारआहे. दरम्यान, देशातील पहिल्या टप्प्यातील मतदानाला 19 एप्रिलपासून सुरुवात झाली. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज 12 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 88 जागांवर मतदान होत आहे. याचा निकाल चार जून रोजी जाहीर होणार आहे. Lok Sabha Election 2024|
हेही वाचा:
राहुल गांधींसाठी वायनाड सुरक्षित जागा का आहे? ; जाणून घ्या या’ जागेचा इतिहास अन् राजकीय समीकरण