Sangli Chandrahar Patil|| देशासह राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र त्यादरम्यान महाविकास आघाडीचे सांगली लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विनापरवाना प्रचार पदयात्रा काढल्यामुळं चंद्रहार पाटील यांच्यासह समर्थकांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं? Sangli Chandrahar Patil|
लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रहार पाटील यांनी 24 एप्रिल रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2.30 या वेळेत खटाव, बेडग गावात मतदारांच्या गाठीभेटी घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार पदयात्रा काढली होती. मात्र, ही प्रचार पदयात्रा काढण्यापूर्वी त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी आचारसंहितेच्या नियमांचा भंग केला आहे. त्यामुळं त्यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच निवडणूक आयोगाकडून नियमावाली प्रसिद्ध करण्यात येते. यामध्ये आचारसंहितेसंदर्भातअसलेल्या नियमांचे निवडणुकीच्या काळात पालन करणं उमेदवाराला बंधनकारक असते. मात्र, नियमांचा भंग केल्यास कारवाई केली जाते.
सांगलीत रंगणार तिहेरी लढत Sangli Chandrahar Patil|
सांगली लोकसभेत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील हे निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीनं त्यांना उमेदवारी दिल्याने सांगली काँग्रेसचे नेते नाराज आहे. कारण विशाल पाटील यांना तिकीट मिळावं यासाठी काँग्रेस नेते आग्रही होते. मात्र, त्यांना तिकीट मिळाले नाही.
अखेर विशाल पाटलांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्या सांगली लोकसभेत तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. भाजपकडून पुन्हा एकदा संजयकाका पाटील यांना संधी देण्यात आली आहे. विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. यातच आता चंद्रहार पाटील यांच्याविरोधात आचारसंहितेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा:
राहुल गांधींसाठी वायनाड सुरक्षित जागा का आहे? ; जाणून घ्या या’ जागेचा इतिहास अन् राजकीय समीकरण