नगर -नगर जिल्ह्यात आज 541 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 50 हजार 918 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे नगर जिल्ह्यातील प्रमाण आता 95.14 टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 219 ने वाढ झाली.
यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 1788 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये 26, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 11 आणि अँटीजेन चाचणीत 182 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 13,जामखेड 01, कर्जत 01, नगर ग्रामीण 02, नेवासा 01, पाथर्डी 02, राहुरी 01, संगमनेर 01, श्रीरामपूर 04 अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या
रुग्णामध्ये , मनपा 08 आणि श्रीगोंदा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 182 जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा 15, अकोले 20, जामखेड 10, कर्जत 13, कोपरगाव 04, नगर ग्रामीण 05, नेवासा 04, पारनेर 13, पाथर्डी 29, राहाता 13, राहुरी 11, संगमनेर 11, शेवगाव 07 श्रीगोंदा 08, श्रीरामपूर 12, कॅंटोन्मेंट 07 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 115, अकोले 33,जामखेड 23, कर्जत 21, कोपरगाव 21, नगर ग्रा 36, नेवासा 26, पारनेर 33, पाथर्डी 36, राहाता 32, राहुरी 15, संगमनेर 52, शेवगाव 14, श्रीगोंदा 29, श्रीरामपूर 31, कॅन्टोन्मेंट 11, मिलिटरी हॉस्पिटल 10,इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.