मुंबई – संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील खासदारांच्या निलंबनाचं सत्र सुरूच आहे. विरोधी पक्षांच्या खासदारांनी केलेल्या गदारोळामुळे आज आणखी 49 खासदारांना निलंबित करण्यात आले. यानंतर राजकीय वर्तुळातून याबाबत संतप्त प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. “हा सत्तेचा गैरवापर आहे मी या प्रकाराचा निषेध करतो” अशी संतप्त प्रातिक्रिया खासदार शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी दिली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना पवार यांनी खासदारांच्या निलंबनाबाबत प्रतिक्रिया दिली. ( Suspension of MP )
सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांना सात वेळेला संसदरत्न पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे. नियम मोडायचा नाही, हे आमच्या पक्षाचं धोरण आहे. आमचे नेते नियम मोडत नाहीत. असं असताना केवळ काय घडलं याची माहिती द्या, अशी मागणी केली असता कारवाई करणं हा सरळ सरळ सत्तेचा गैरवापर आहे, असं स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. एका मराठी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
संसदेत येणारे लोक कोण होते. त्यांचा हेतू काय होता ? याची माहिती न देता उलट त्याच खासदारांवर कारवाई केली गेली. याचा अर्थ संसदीय लोकशाहीची प्रतिष्ठेचं सरकारला गांभीर्य नाही असं देखील पवार यावेळी म्हणाले.
आज निलंबित झालेले खासदार
मनीष तिवारी, चंद्रशेखर प्रसाद, डिंपल यादव, कार्ती चिदंबरम, एसटी हसन, सुप्रिया सुळे, शथी थरूर, दानिश अली, माला रॉय, राजीव रंजन सिंग, संतोष कुमार, प्रतिभा सिंग, मोहम्मद सादिक, जगबीर सिंग गिल, महाबली सिंग, एमके विष्णू प्रसाद. , फारुख अब्दुल्ला, गुरजीत सिंग औजला, फजलुर रहमान, रवनीत सिंग बिट्टू, दिनेश यादव, के सुधाकरन, सुशील कुमार रिंकू.