Sunetra Pawar | Ajit Pawar | Sharad Pawar। देशात लोकसभा निवडणूक लागल्या असून आता सर्वपक्षाने आपल्या उमेदवारांना रिंगणात उभे केले आहे. त्यातच राज्यातही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला आहे.
त्यात सर्वात चर्चेत असणार मतदारसंघ म्हणजे बारामती. याठिकाणी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत रंगणार आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवार आता मैदानात उतरले असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. । Sunetra Pawar | Ajit Pawar | Sharad Pawar
अश्यातच, ‘मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार’ अशी टिप्पणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांचे नाव न घेता केली अन् लेक अन् सुनेत केलेल्या फरकावरून नवा वाद सुरु झाला. मात्र, आता यावरून अजित पवार यांनी पलटवार केला होता.
एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, “सासूचे संपले 4 दिवस… आता सुनेचे 4 दिवस येऊद्या… असा टोला अजित पवारांनी लगावला आहे. 40 वर्ष झाली तरी बाहेरचे म्हणत आहेत, असंही खोचक भाष्य अजित पवार यांनी शरद पवारांवर केलं.
ही वडीलधारी जरा, जुना काळ आठवत असेल, तर त्यांना म्हणा, जुना काळ आता थोडा बाजूला ठेवा. आता नवीन काळ बघा. आता सासूचे चार दिवस संपले, आता सूनेचे चार दिवस येऊद्या, असं सांगाना.
की फक्त सासू-सासू-सासू, मग सुनेनं फक्त बघत बसायचं? बाहेरची-बाहेरची-बाहेरची, असं कुठं असतं का राव? असतं का? असा सवाल अजित पवारांनी शरद पवारांना केलाय.
‘मूळ पवार आणि बाहेरचे पवार’ वक्तव्यावर शरद पवारांचा घुमजाव… । Sunetra Pawar | Ajit Pawar | Sharad Pawar
शरद पवार यांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचं स्पष्टीकरण दिलं. तसेच आपण तसं वक्तव्य केलंच नव्हतं, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले की, “मी तसं बोललेलो नव्हतो. मी जे बोललो होतो, पत्रकाराने विचारलं, अजित पवार यांनी काही भाषण केलं होतं. त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं की, जनतेनं मला निवडून दिलं. त्यांना स्वत:ला निवडून दिलं, ताईला निवडून दिलं,
आता सूनेला निवडून द्या. त्यापुढे त्यांनी आणखी काही वाक्य वापरलं. त्याच्या संबंधित मी फक्त स्पष्टीकरण केलं. यापेक्षा वेगळा काही अर्थ काढण्याची गरज नाही..” असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं. । Sunetra Pawar | Ajit Pawar | Sharad Pawar
नेमका हा वाद पेटला कसा?
उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत म्हणाले होते की, “तुम्ही मुलाला म्हणजेच मला मतदान केलं. त्यानंतर साहेबांना मतदान केलं, नंतर मुलगी सुप्रिया सुळे यांना मतदान केलं. आता सुनेला मतदान करा. म्हणजे पवारांना मतदान केल्याचं समाधान मिळेल.