पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जलतरण तलावमध्ये पोहण्यासाठी आता नागरिकांना महापालिकेच्या संकेतस्थळावर स्वत:चे ऑनलाइन नोंद खाते काढावे लागणार आहे. त्यानुसार संबंधित जलतरण तलावावरील गर्दीचे नियोजन करण्यासाठी हा बदल लागू करण्यात आला आहे. महापालिकेच्या संकेतस्थळारील जलतरण तलाव नोंदणी या लिंकवर क्लिक करून बॅचचे आरक्षण करावे लागणार आहे.
सध्या उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे तरण तलावावर पोहण्यास येणार्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तलावावर गर्दीही वाढत आहे. तिकिटे घेण्यासाठी खिडकी जवळ खूप गर्दी होत आहे. प्रत्येक बॅचमध्ये जलतरण तलावावर क्षमतेप्रमाणे नागरिकांना पोहण्यासाठी प्रवेश दिला जातो.
पण, ज्या नागरिकांना त्या बॅचमध्ये तिकीट मिळत नाही. ते नागरिक तक्रार करतात. त्यामुळे महापालिकेने ऑनलाइन पद्धतीने तरण तलावासाठी बॅचचे आरक्षण काढण्यास सुरवात केली आहे.
ऑनलाइन बॅचचे आरक्षण करण्याची पद्धत
-महापालिकेच्या ुुु.लिालळपवळर.र्सेीं.ळप या संकेतस्थळारील तरण तलाव नोंदणी या लिंकवर क्लिक करणे
– पोहणार्या नागरिकाने, पाल्याने, पालकांनी आपले नोंद खाते तयार करावे. ही प्रक्रिया एकदाच करावी लागेल
– नोंद केल्यानंतर लॉगइन करावे. इच्छित जलतरण तलाव निवडून तारीख, वेळ निश्चित करावी.
– जास्तीत-जास्त तीन लोकांची नोंद करु शकता.
– पोहणार्या नागरिकाचा आधार नंबर या ठिकाणी नोंद करावा लागेल.
– यानंतर निवडलेल्या पोहणार्यांच्या संख्येनुसार प्रत्येकी दहा रुपये या दराने ऑनलाइन पेमेंट करणे
– पेमेंट केल्यानंतर तो सीरियल नंबर हा लक्षात ठेवावा. निवडलेल्या तलावावर प्रवेशाच्या वेळेस हा नंबर संबंधित कर्मचार्यांना सांगून आपली नोंद प्रमाणित करावी.
– तरण तलाव सरावासाठी ऑनलाइन पद्धतीने बॅचचे आरक्षण केल्यानंतर तलावावर येताना आधार कार्डची झेरॉक्स प्रत आणणे बंधनकारक आहे.