तळेगाव दाभाडे (वार्ताहर)- आमदार सुनील शंकरराव शेळके फाऊंडेशन,रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी, आणि रोट्रक्ट क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात रविवारी (दि. 28) रोजी 20 वधू वर जोडपी विवाहबद्ध झाली.
तळेगाव दाभाडे येथील थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील मराठी शाळा प्रांगणात हा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला .या विवाह सोहळ्यासाठी मावळ व मुळशी, जुन्नर, आंबेगाव, रायगड, श्रीगोंदा, मुंबई, पिंपरी, चिंचवड व पुणे या ठिकाणाहून वधू-वर जोडपी सहभागी झाली होती.
वधू- वरांचा सकाळी साखरपुडा, हळदी समारंभ व दुपारी भोजन समारंभ आणि सायंकाळी वेळेवर विवाह पार पडला. या वधू-वरांना पूर्ण पोशाख, दागिने,संसारोपयोगी भांडी याशिवाय दोन भाग्यवान जोडप्यांना 2 गीर जातीच्या गायी तसेच तीन जोडप्यांना तीन मोबाईल फोन लक्की ड्रॉ द्वारे देण्यात आले.
या सोहळ्यातील वधू-वरांना आशिर्वाद देण्यासाठी आमदार सुनील शेळके, रोटरी क्लबचे डि. गव्हर्नर शितल शहा्, संतोष मराठे, नितीन ढमाले महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माऊली दाभाडे,
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, माजी सभापती बाबुराव वायकर, रोटरी सिटीचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे, माजी नगराध्यक्ष अॅड. रवींद्र दाभाडे, सुरेश चौधरी, शिवाजी असवले,निवृत्ती शेटे सह मान्यवर वर्हाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी रोटरी सिटीचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे सह पदाधिकारी सुरेश शेंडे,मनोज ढमाले, शशिकांत हळदे,दादासाहेब उर्हे, किरण ओसवाल, भगवान शिंदे,संतोष शेळके,संजय मेहता,नितीन शहा, हरिश्चंद्र गडसिंग, दिलीप पारेख, सुरेश धोत्रे, सुरेश दाभाडे, प्रदिप मुंगसे व सर्व सदस्यांनी या सोहळ्यासाठी विशेष परिश्रम घेतले.