तळेगाव दाभाडे, (वार्ताहर)- सन 2023 -24 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या भारती विद्यापीठ गणित परीक्षा या बहिस्थ परीक्षेत नवीन समर्थ विद्यालयाची कु. सानिका नवनाथ नरूटे या सातवीतील विद्यार्थिनीने गणित- द्वितीया परीक्षेत 100 पैकी 100 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.
या परीक्षेला बसलेल्या विद्यालयाच्या एकूण 398 विद्यार्थ्यांपैकी 73 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. त्याचप्रमाणे 47 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 59 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत व 71 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्राचार्या वासंती काळोखे व पर्यवेक्षक रेवाप्पा शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती धनवट, वंदना मराठे, समीर गाडे, गायत्री जगताप, कावेरी कोंडभर, ज्योती मातवंडकर यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक प्राचार्य, पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.