UPSC CSE Result 2023: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) मंगळवारी नागरी सेवा परीक्षा- 2023 चा निकाल जाहीर केला. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय विदेश सेवा (IFS) साठी 1016 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. जागांनुसार यापैकी 180 IAS आणि 200 IPS अधिकारी होतील. ही परीक्षा सप्टेंबर 2023 मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर 4 जानेवारी ते 9 एप्रिलपर्यंत मुलाखती झाल्या. आज त्याचे निकाल जाहीर झाले. एकूण 1016 निवडलेल्या उमेदवारांपैकी 664 पुरुष आणि 352 महिला आहेत.
एकूण 1016 उमेदवारांमध्ये 347 सामान्य श्रेणी, 115 आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (EWS), 303 इतर मागासवर्ग (OBC), 165 अनुसूचित जाती (SC) आणि 86 अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे.
लखनौच्या आदित्य श्रीवास्तवने ऑल इंडिया रँक 1 मिळवला आहे. तर, अनिमेष प्रधानला दुसरा तर अनन्या रेड्डीला तिसरा क्रमांक मिळाला. upsc.gov.in या UPSC च्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन उमेदवार त्यांचा निकाल पाहू शकतात.
टॉप 5 रँकमधील 3 उमेदवार आधीच आयपीएस अधिकारी आहेत –
यावर्षी टॉप 5 रँकमध्ये असलेले 3 उमेदवार आधीच आयपीएस अधिकारी आहेत. रँक 1 मिळवणारा आदित्य श्रीवास्तव, रँक 4 पीके सिद्धार्थ रामकुमार आणि रँक 5 रोहानी हे हैदराबादमधील राष्ट्रीय पोलिस अकादमीमध्ये IPS प्रशिक्षण पूर्ण करत आहेत.
सेवेत असताना या परीक्षेत आयपीएस अधिकाऱ्याने अखिल भारतीय रँक 1 मिळवण्याची गेल्या 11 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी 2013 मध्ये आयपीएस अधिकारी गौरव अग्रवाल यांनी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत ऑल इंडिया रँक 1 मिळवला होता.
आदित्य श्रीवास्तव यांनी लखनौच्या सीएमएस प्रायव्हेट स्कूलच्या अलीगंज शाखेतून शिक्षण घेतले आहे. गेल्या वर्षी आदित्य यांचा क्रमांक 216 होता. सध्या ते हैदराबादच्या आयपीएस ट्रेनिंग अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. लखनौच्या विकास नगरमध्ये त्यांचे कुटुंब राहते. आदित्य यांनी 2014 मध्ये 12वीची परीक्षा 98.4% गुणांसह उत्तीर्ण केली होती. त्यानंतर आदित्य यांनी आयआयटी कानपूरमधून बीटेक आणि एमटेकची पदवी घेतली. UPSC ची तयारी सुरू करण्यापूर्वी त्यांनी गुंतवणूक बँकिंग कंपनी Goldman Sachs मध्ये देखील काम केले. त्यांचे वडील अजय श्रीवास्तव हे भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) मध्ये सहाय्यक लेखा परीक्षक आहेत.
गेल्या 5 वर्षात UPSC नागरी सेवा परीक्षेत महिलांचा टक्का वाढला आहे. 2018 आणि 2019 मध्ये महिला उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 24% होते. 2020 मध्ये ते 29% वर पोहोचले. त्याच वेळी, 2021 मध्ये ते 3 अंकांनी घसरून 26% झाले. 2022 मध्ये, हा आकडा पुन्हा एकदा 34% होता. गेल्या वर्षी निवडलेल्या 933 उमेदवारांपैकी 320 महिला होत्या.
मुख्य आणि व्यक्तिमत्व चाचणीचे गुण एकत्र करून तयार केली जाते UPSC गुणवत्ता यादी –
नागरी सेवा परीक्षेचे तीन भाग असतात. त्यामध्ये प्रिलिम्स, मुख्य आणि व्यक्तिमत्व चाचणी यांचा समावेश आहे. मुख्य परीक्षेत 9 निबंध प्रकारचे पेपर असतात. यातील दोन पेपर पात्रता स्वरूपाचे आहेत म्हणजे फक्त हे दोन पेपर उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
त्यांचे गुण गुणवत्ता यादीत जोडले जात नाहीत. पेपर 1 ते पेपर 6 आणि व्यक्तिमत्व चाचणीच्या गुणांवरून गुणवत्ता यादी तयार केली जाते.
यूपीएससी परीक्षेत टॉपर टॉप 10 –
1) आदित्य श्रीवास्तव
2) अनिमेष प्रधान
3) डोनुरु अनन्या रेड्डी
4) पीके सिद्धार्थ रामकुमार
5) रुहानी
6) सृष्टी दाबस
7) अनमोल राठोड
8) आशिष कुमार
9) नौशीन
10) ऐश्वर्याम प्रजापती
कोणत्या उमेदवाराला किती गुण मिळाले ?
निकाल आज जाहीर झाला असला तरी निवडलेल्या उमेदवारांच्या गुणांची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. UPSC ने सांगितले की निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसांच्या आत गुण त्यांच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर अपलोड केले जातील. म्हणजेच यानंतर कोणाला किती गुण मिळाले याची माहिती मिळेल.