जळोची (वार्ताहर)- बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांसह ३८ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचार शिगेला पोहोचला असून, जोरदार प्रचार सुरू आहे. मतदार संघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असाच थेट सामना रंगला असून दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार केला जात आहे.
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ बिरजू मांढरे मित्र मंडळाच्या वतीने बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदरसह आदी भागात घरोघरी जात मतदारांशी संवाद साधला जात आहे. तसेच ठीकठिकाणी घोंगडी बैठका, बैठका घेऊन जोरदार प्रचार केला जात आहे. प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रासाठी जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी केलेली विकासकामे यांचा दाखला दिला जात आहे. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदरसह आदी भागातील वाड्या वस्त्यांवर जाऊन पत्रक वाटप केले जात आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करीत आहोत. विकासात्मक चेहरा म्हणून महाराष्ट्रात अजित पवार यांची ओळख आहे. बारामतीसह या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी अजित पवार यांच्या विचाराचा खासदार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात आम्ही उतरलो आहोत. – बिरजू मांढरे, माजी उपनगराध्यक्ष, बारामती.