झी मराठीवरील माझा होशील ना ही मालिका इरसाल ब्रह्मे मामा आणि सई-आदित्यचं प्रेम ह्यामुळे चांगलीच लोकप्रिय आहे. लग्नानंतर सई आता तिच्या चार सासऱ्यांसोबत, एका आज्जेसासऱ्यासोबत आणि नवरोबा आदित्यसोबत मजेत राहू लागलीये. आता तर तिने ब्रह्मे घराला गुलप्रीतच्या रुपात नवीन सुनबाईही मिळवून दिलीये.
पण ह्या साऱ्या घटनांच्यामधे सई-आदित्यला स्वत:साठी वेळच काढता येत नाहिये. त्यामुळेच ह्या रविवारी दोघांनी सिनेमाला जायचा प्लान केलाय! आदित्यने सईसाठी ह्या खास सिनेमाचा बेत आखलाय.
सई-आदित्य मिळून एका आटपाट नगरीच्या निरागस राजकुमाराची आणि बिनधास्त राजकुमारीची गोष्ट पाहणार आहेत आणि आजवर न झालेले अनेक खुलासे ह्या सिनेमाच्या निमित्ताने होणार आहेत. तेव्हा ह्या रविवारी हा दोन तासाचा खास भाग चुकवू नका!ब्लॉकब्लस्टर नाईट विथ ब्रह्मे बॉईज! रविवार २३ मे संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर