नीना गुप्ताने गेल्या काही वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले पाय घट्ट रोवले आहेत. काही संस्मरणीय भूमिका तिने साकारल्या आहेत आणि आता ती लवकरच तिची ऑटोबायोग्राफी घेऊन येणार आहे. आत्मकथन असलेल्या तिच्या पुस्तकाचे प्रकाशन 14 जूनला होणार आहे. “सच कहूं तो’ असे तिने लिहिलेल्या पुस्तकाचे नाव आहे.
लॉकडाऊनच्या काळात तिने हे पुस्तक लिहून काढले आहे. ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये तिने या पुस्तकामागील आपल्या भूमिका सांगितल्या आहेत. “आपण घरी एकांतात, थोडे नर्व्हस आणि दुःखात असू, तेव्हा माझे पुस्तक या अवघड दिवसात बळ मिळवून देईल.’ असे तिने म्हटले आहे.
या लॉकडाऊनच्या काळात नीना आणि तिचा नवरा विवेक मेहरा यांच्यातील जवळीक वाढली. याच काळात नवऱ्याला ओळखायला शिकल्याचेही नीनाने म्हटले आहे. नीना गुप्ताचा “सरदार का ग्रॅन्डसन’ अलीकडेच ओटीटीवर रिलीज झाला. त्यामध्ये आपण जरा जास्तच वयाच्या व्यक्तीची भूमिका केली, असे आता वाटायला लागल्याचेही तिने सांगितले. तिच्या पुस्तकात असे अनेक खुलासे असण्याची शक्यता आहे.