पारनेर – धनगर समाज विकासाच्या प्रवाहापासुन लांब आहे. त्यास मुख्य प्रवाहात आणणार. तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखाने आहे. परंतु त्यामध्ये मेंढ्यावर उपचारासाठी सुविधा व लस उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी नगर व पारनेर तालुक्यात मेंढपाळ मोठ्या प्रमाणावर असल्याने मेंढपाळासाठी अत्याधुनिक दवाखाना उभारणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांनी दिले आहे.
ढवळपुरी (ता.पारनेर) येथील खंडोबा देवस्थान परिसरातील धनगर समाजातील नागरिकांशी लंके यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. लंके म्हणाले, पारनेर तालुक्यातील धनगर समाज हा नेहमीच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बरोबर राहिला असून यावेळी देखील हा समाजबरोबर राहील आपण धनगर आरक्षणचा प्रश्न विधीमंडळात मांडू, धनगर समाजातील मुलांना उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते. तेथेच रहावे लागते त्यांच्या सोयीसाठी प्रयत्न केले जातील. येथील नागरिकांचे घरकुलांचे प्रश्न आहेत. तो सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लंके यावेळी म्हणाले.