येळसे येथील काळूबाईच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात साजरा

पवनानगर – मावळ तालुक्‍यामधील पवनमावळ परिसरातील येळसे गावातील काळूबाईच्या मूर्तीप्रतिष्ठापणाचा द्वितीय वर्धापनदिन उत्साहात झाला. सकाळी प्रथम येळसे बसस्टॉपपासून देवीच्या पालखीतून ढोल-ताशांच्या गजरात भक्‍तीमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या वेळी गावातील महिलांनी फुगडी खेळत देवीची गाणीही गायली. गावातील ग्रामस्थांबरोबर पवनमावळातील भक्‍तही उपस्थित होते.

यामध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता. गावातील तरुण उपस्थित होते. सकाळी देवीची महापूजा करण्यात आली. चंद्रकांत ठाकर यांनी पूजा केली. दुपारी देवीची महाआरती झाली. गावातील सर्व ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. गावातील युवक वर्गाने मंदिर परिसरासमोरील स्वच्छता करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून येळसे गावात काळूबाई देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.