#CWC19 : आव्हान कायम राखण्यास श्रीलंकेला विंडीज विरूध्द विजय अनिवार्य

स्थळ – चेस्टर ली स्ट्रिट
वेळ – दु. 3 वा.

चेस्टर ली स्ट्रिट – रनरेट आणि इतर गणितांचा अभ्यास करता बाद फेरीत पोहोचण्यासाठी श्रीलंकेच्या संघाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवणे आवश्‍यक असून स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असताना केवळ आपली प्रतिष्ठा जपण्यास वेस्ट इंडिजचा संघ आज प्रयत्नशील असणार आहे.

विश्‍वचषक स्पर्धेपूर्वी डार्क हॉर्स म्हणुन गणल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजच्या संघाला यंदाच्या स्पर्धेत म्हणावी तशी कामगिरी करता आली नसल्याने आजच्या सामन्यात विजय मिळवत किमान स्पर्धेत आपल्या संघाची प्रतिष्ठा कायम राखण्यास त्यांचा संघ प्रयत्नशील असणार आहे. तर, दुसरीकडे कोणतीही अपेक्षा नसलेल्या श्रीलंका संघाने अनपेक्षितपणे इंग्लंडचा पराभव करत स्पर्धेत यशस्वी पुनरागमन केले होते. तर, पावसामुळे त्यांचे दोन सामने अनिर्णीत राहिल्याने त्यांच्या गुणांमध्ये भर पडत गेल्याने श्रीलंकेचा संघ स्पर्धेतील बाद फेरीत पोहोचण्याची शक्‍याता निर्माण झाली आहे.

स्पर्धेच्या सुरूवातीपासुनच श्रीलंकेच्या संघाला यंदाचा सर्वात कमजोर संघ समजला जात होता. सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये त्यांची कामगिरीही तशीच राहिली होती. मात्र, नंतर त्यांनी अफगाणिस्तान आणि इंग्लंडचा पराभव करत स्पर्धेत जोरदार कामगिरीची नोंद केली होती. त्यामुळे त्यांचा संघ पाकिस्तान, बांगलादेश आणि इंग्लंडच्या बरोबरीने बाद फेरीसाठी पात्र ठरण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. मात्र, बाद फेरी गाठण्यास आजच्या सामन्यात त्यांना विजय मिळवण्या बरोबरच काही गणितांचा विचार करता ते बाद फेरीसाठी पात्र ठरू शकतात.

प्रतिस्पर्धी संघ –

श्रीलंका – दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), धनंजय डि सिल्व्हा, नुवान प्रदीप, अविष्का फर्नांडो, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, कुशल मेंडिस, जीवन मेंडिस, कुशल परेरा, थिसारा परेरा, मिलिंदा सिरीवर्धने, लहिरु थिरिमाने, इसरु उडाना, जेफ्री व्हॅंडरसे.

वेस्ट इंडिज – जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, फॅबिअन ऍलन, कार्लोस ब्रेथवेट, डॅरेन ब्राव्हो, शेल्डॉन कॉट्रेल, शॅनन गॅब्रिएल, शिमोरन हेटमेयर, शाय होप, एल्विन लुईस, अशले नर्स, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), केमार रोच, ओशाने थॉमस.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)