कोलोंबो – श्रीलंकेत १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर दरम्यान अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहेत. देशाच्या निवडणूक आयोगाने गुरुवारी ही घोषणा केली. राज्यघटनेतील तरतुदींनुसार ठराविक मुदतीत राष्ट्रपतीपदाची निवडणूक घेण्यासाठी नामनिर्देशन मागवले जाईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. (Sri Lanka to hold presidential election between September 17 and October 16: Election Commission)
श्रीलंकेत १९ नोव्हेंबर २०१९ रोजी शेवटची राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली होती. त्यावेळी गोटाबाया राजपक्षे देशाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. आर्थिक दिवाळखोरीला कारणीभूत असल्याच्या आरोपावरून त्यांच्या सरकारविरोधात देशभर झालेल्या जनआंदोलनाच्या दुसऱ्या स्मृतीदिनीच अध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
दिनांक ९ मे २०२२ रोजी तत्कालिन पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना सरकारविरोधी आंदोलनानंतर राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी रानिल विक्रमसिंघे पंतप्रधान झाले. दोन महिन्यांनंतर, विक्रमसिंघे यांनी २०२४ च्या शेवटपर्यंत शिल्लक कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून गोटाबाया राजपक्षे यांच्या जागी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती.
अध्यक्ष विक्रमसिंघे नवीन निवडणूक चिन्हाखाली राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवतील अशी अपेक्षा आहे. ७५ वर्षीय विक्रमसिंघे राष्ट्रीय उमेदवार म्हणून अनेक पक्षांचे प्रतिनिधित्व करतील, असे त्यांच्या उच्च सहाय्यकाने गेल्या महिन्यात सांगितले.