West Indies Cricket : टी-20 विश्वचषक 2024 सुरू होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मोठी कारवाई करत वेस्ट इंडिजचा फलंदाज डेवोन थॉमसवर पाच वर्षांची बंदी घातली आहे. बोर्डाने 2 मे रोजी हा निर्णय घेतला. श्रीलंका क्रिकेट, अमिराती क्रिकेट बोर्ड आणि कॅरेबियन प्रीमियर लीगच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेचे उल्लंघन केल्याच्या सात गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर ICC ने थॉमसला 22 मे 2028 पर्यंत आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यास बंदी घातली आहे.
या आरोपांमुळे 34 वर्षीय खेळाडूला गेल्या वर्षी निलंबित करण्यात आले होते. आता त्याने मॅच फिक्सिंगचे आरोप स्वीकारले, त्यानंतर थॉमसवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली. त्याचवेळी, हे आरोप स्वीकारल्यानंतर त्याची शिक्षा 18 महिन्यांनी कमी करण्यात आली आहे.
आयसीसीचे विधान…
या संदर्भात आयसीसीच्या इंटिग्रिटी युनिटचे महाव्यवस्थापक ॲलेक्स हेल्स म्हणाले की, “डेव्हॉन थॉमस, जो आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि फ्रँचायझी क्रिकेट व्यावसायिकरित्या खेळला आहे, त्याने अनेक भ्रष्टाचार विरोधी सत्रांमध्ये भाग घेतला होता. त्याला माहित होते की भ्रष्टाचार विरोधी संहिता अंतर्गत त्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत परंतु तो त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात अयशस्वी ठरला. ही बंदी योग्य प्रकारे लावली गेली आहे आणि भ्रष्टाचारात गुंतलेल्या इतर खेळाडूंनाही संदेश जातो की असे करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”
IPL 2024 (DC vs RR Match 56) : पंचांशी हुज्जत घालणे पडलं महागात..! BCCI ची संजू सॅमसनवर मोठी कारवाई…
खेळाडूची कारकीर्द….
डेव्हन थॉमसने डिसेंबर 2022 मध्ये वेस्ट इंडिजसाठी त्याची एकमेव कसोटी खेळली. याशिवाय त्याने 21 एकदिवसीय आणि 12 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे 31 धावा, 238 धावा आणि 51 धावा केल्या. या काळात त्याने चार विकेट्सही घेतल्या. त्याने शेवटचा सामना 2022 मध्ये खेळला होता.