Sri Lanka Cricket Board : श्रीलंकेच्या क्रिकेटमध्ये मोठा बदल झाला आहे. आयसीसीने निलंबित केल्यानंतर आता लंकन बोर्डाने संघाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा तिन्ही फॉरमॅटमधील नवीन कर्णधाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 32 वर्षीय धनंजय डी सिल्वा याची झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी कसोटी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, 28 वर्षीय कुसल मेंडिस एकदिवसीय आणि 26 वर्षीय वानिंदू हसरंगा टी-20 मध्ये कमान सांभाळेल.
कसोटी कर्णधार दिमुथ करुणारत्ने आणि ODI-T20 कर्णधार दासुन शनाका यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. प्रथमच, श्रीलंकेकडे आता क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार असणार आहेत.
Ranji Trophy 2023-24 : महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी केदार जाधव…
मुख्य निवडकर्ता उपुल थरंगा यांनी कोलंबो येथे पत्रकारांना सांगितले की, “तिन्ही फॉरमॅटसाठी एकच कर्णधार असणे मला आवडेल, परंतु सध्या आमच्याकडे असलेल्या खेळाडूंसोबत आम्ही तसे करू शकत नाही.” गेल्या वर्षीच्या विश्वचषकात संघ नवव्या स्थानावर असूनही, निवडकर्त्यांनी 2027 मध्ये होणाऱ्या पुढील एकदिवसीय विश्वचषकापर्यंत मेंडिसला कायम ठेवण्याचा संकल्प केला होता.
T20 विश्वचषकात हसरंगा असेल कर्णधार…
जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषकात हसरंगा संघाचे नेतृत्व करेल. श्रीलंकेचा संघ 6 जानेवारीपासून झिम्बाब्वेविरुद्ध तीन एकदिवसीय आणि 14 जानेवारीपासून तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर संघ अफगाणिस्तानविरुद्ध तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि एक कसोटी सामना खेळणार आहे.
करुणारत्ने 30 कसोटी सामन्यांमध्ये होता कर्णधार …
धनंजय डी सिल्वा कसोटीत संघाचे नेतृत्व करणारा श्रीलंकेचा 18वा खेळाडू ठरणार आहे. करुणारत्नेने 30 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले. या कालावधीत संघाने 12 सामने जिंकले आणि 12 सामन्यात पराभव पत्करले. सहा सामने अनिर्णित राहिले.
Zagreb Open 2024 Wrestling : क्रोएशियातील स्पर्धेतून बंजरंगची माघार, समोर आलं ‘हे’ कारण…
श्रीलंकेचे सर्वात उल्लेखनीय विजय त्याच्या नेतृत्वाखाली झाला. करुणारत्नेच्या संघाने 2019 च्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत संस्मरणीय कसोटी मालिका जिंकली होती. अशी कामगिरी करणारा श्रीलंका पहिला आशियाई संघ ठरला.