कोलोंबो – श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाला या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. आर्थिक संकटाने ग्रासलेल्या श्रीलंकेमध्ये गेल्या २ वर्षांपासून आर्थिक आणि राजकीय अस्थिरता आहे.
निवडणूक आयोगाने अध्यक्षपदाची पुढील निवडणूक सप्टेंबरपर्यंतघेतली पाहिजे आणि ती नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत होणे आवश्यक आहे. २०२५ च्या ऑगस्टपूर्वी संसदेची निवडणूक होणार नाही. परंतु अध्यक्ष विक्रमसिंघे यांना ऑगस्ट २०२० मध्ये निवडून आलेली संसद विसर्जित करून आता कधीही ही निवडणूक घेण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे.