गावाकडे जाणाऱ्यांना संजय राऊतांचा खास सल्ला

मुंबई  – करोना व्हायरस सध्या जगभरात हाहाकार माजवला आहे. राज्यामध्ये पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. यामुळे नागरिकांनी आपल्या गावाचा रस्ता धरला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी खास सल्ला दिला आहे.

संजय राऊत म्हणाले कि, आपण जिथेही असाल. जसेही असाल तिथे आपण खूश रहा. आपल्याला भेटण्याची सध्या तरी आवश्यकता नाही. आपल्याला भेटण्याची नाही तर आपण कायम आमच्यासोबत रहावं ही जरूरी आहे, असे खास संदेश त्यांनी दिला आहे.

दरम्यान, राज्यात एकूण करोनाग्रस्तांची संख्या १०१ झाले आहेत. कोरोनाचं संसर्ग अधिक होऊ नये यासाठी राज्य शासनाने गंभीर पावलं उचलली आहेत. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्यात संचारबंदीची घोषणा केली आहे. जिल्ह्यात जाता येणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.