पुणे- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपचार सुरू असलेल्या ठिकाणी आणि रुग्ण आढळलेल्या परिसरात महापालिकेमार्फत सोडियम हैपो क्लोराईड ची फवारणी करण्यात येत आहे. त्या सगळ्या ठिकाणी फवारणीकरुन परिसराचं निर्जंतुकीकरण करण्याचं काम महापालिकेनं हाती घेतलं आहे.
पुण्यातील अन्य ठिकाणी आवश्यक नसल्यामुळे फवारणी करण्याची गरज नाही, जेव्हा गरज असेल तेव्हा फवारणी करण्यात येईल, अशी माहिती शेखर गायकवाड यांनी दिली आहे.
दरम्यान, पुण्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर पुण्यातून बाहेर गेलेेल्या लोकांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येत आहे.