सासवड (प्रतिनिधी) – बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. 28) सकाळी 10 वाजता महाविकास आघाडीचा जाहीर मेळावा पालखी तळावर होणार आहे. या मेळाव्यात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत, सचिन आहेर, संग्राम थोपटे, संजय जगताप, जगन्नाथ शेवाळे उपस्थित राहणार आहेत.
सासवड येथे बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्ष, आम आदमी पक्ष, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना उद्धाव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी वरील माहिती देण्यात आली.
याप्रसंगी समन्वयक सुधीर राऊत, संभाजी झेंडे, सुदाम इंगळे, नंदूकाका जगताप, विजयराव कोलते, बंडूकाका जगताप, माणिकराव झेंडे पाटील, पुष्कराज जाधव, महादेव टिळेकर, अमोल कामठे, अभिजीत जगताप, राहुल गिरमे, संदीप जगताप, रामभाऊ जगताप, बाजीराव कुंजीर, नारायण भिंताडे उपस्थित होते.