Second Phase Voting। लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या दुसऱ्या टप्प्यात आज 13 राज्यांमधील 88 जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा मुलगा दुष्यत सिंग आणि माजी संरक्षण मंत्री एके अँटनी यांचा मुलगा अनिल अँटोनी यांचे भवितव्य पणाला लागले आहे. या टप्प्यात अनेक उमेदवार वारसा हक्काचे दावेदार आहेत.
वारसदारांचे भवितव्य जनता ठरवणार Second Phase Voting।
दुसऱ्या टप्प्यात केरळच्या सर्व 20 जागांसह उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या प्रत्येकी 8, कर्नाटकच्या 14, बिहारच्या 5, राजस्थानच्या 13, मध्य प्रदेशच्या 6, आसामच्या 5, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडच्या प्रत्येकी 3 जागांवर मतदान होणार आहे.
मणिपूर, त्रिपुरा आणि जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होणार आहे. ज्याचा निकाल 4 जून रोजी सर्वांना दिसेल. सध्या ईव्हीएममध्ये वारसदारांचे भवितव्य जनता ठरवणार आहे.
#WATCH | Kerala: BJP candidate from Pathanamthitta, Anil Antony shows his inked finger after casting his vote at a polling booth in Thiruvananthapuram.
CPI-M has fielded Thomas Isaac from here. Congress has its sitting MP Anto Antony as its candidate in the constituency.… pic.twitter.com/GI2OZCAy41
— ANI (@ANI) April 26, 2024
दुसऱ्या टप्प्यातील ‘हे’ आहेत वारसा हक्कदार Second Phase Voting।
1. काँग्रेस पक्षाचे जालोरचे उमेदवार वैभव गेहलोत हे राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र आहेत.
2. झालवाड-बारणमधील भाजपचे उमेदवार दुष्यंत सिंह हे राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे पुत्र आहेत.
3. महाराष्ट्राच्या अकोला लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत.
4. कर्नाटकातील मंड्या मतदारसंघातील जेडीएसचे उमेदवार एचडी कुमारस्वामी हे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे पुत्र आहेत.
5. बेंगळुरू ग्रामीणमधील भाजपचे उमेदवार सीएन मंजुनाथ हे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे जावई आहेत.
6. हसन लोकसभा मतदारसंघातील JDS उमेदवार प्रज्वल रेवन्ना, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आहेत.
7. बेंगळुरू ग्रामीणमधील काँग्रेसचे उमेदवार, डीके सुरेश, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे भाऊ आहेत.
8. त्रिशूरमधील काँग्रेसचे उमेदवार के मुरलीधरन हे माजी मुख्यमंत्री के करुणाकरन यांचे पुत्र आहेत.
9. अनिल अँटनी, पठाणमथिट्टी येथील भाजपचे उमेदवार, माजी संरक्षण मंत्री एके अँटनी यांचे पुत्र आहेत.